Sunday , April 5 2026
Breaking News

‘रवळनाथ’ हौसिंग फायनान्समध्ये गुढीपाडव्याला ७.९० कोटी ठेवींचे संकलन

Spread the love

 

ग्राहकांचा नवीन वर्षात उत्स्फूर्त प्रतिसाद; १६ मल्टीस्टेट शाखाद्वारे संस्थेचे कार्य

निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स (मल्टी-स्टेट) संस्थेमध्ये १६ शाखांमध्ये मिळून तब्बल ७ कोटी ९० लाख इतक्या ठेवींचे संकलन झाले आहे, अशी माहिती ‘रवळनाथ’चे संस्थापक अध्यक्ष व संचालक एम. एल. चौगुले, अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणक, उपाध्यक्ष डॉ. संजय चौगुले यांनी दिली. एम. एल. चौगुले म्हणाले, पारदर्शक व्यवहार, तत्पर सेवा आणि सभासदांनी दाखवलेला विश्वास यामुळेच संस्थेचे अल्पावधीत प्रगती केली आहे. संस्थेच्या अनेक ग्राहकांनी गुंतवणूक करून नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. संस्थेच्या आजरा, गडहिंग्लज, चंदगड, नेसरी, कोल्हापूर, जयसिंगपूर, बेळगाव, निपाणी, कुडाळ, सुविधा केंद्र गडहिंग्लज, सांगली, पुणे, कराड, सांगोला, चिक्कोडी आणि धारवाड या १६ शाखांमधून ७ कोटी ९० लाखाच्या ठेवी जमा झाल्या आहेत. कोल्हापूर शाखेने सर्वाधिक विक्रमी ठेव संकलन केले आहे. विश्वासार्हता आणि ठेवींच्या सुरक्षिततेची खात्री यामुळेच ग्राहकांनी रवळनाथमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दर्शविली आहे.
शाखानिहाय ठेवी अशा, शाखा आजरा (५५ लाख ९४ हजार), गडहिंग्लज (९१ लाख ३९ हजार), चंदगड (६) लाख ७५ हजार), नेसरी (४१ लाख ३४ हजार), गडहिंग्लज सुविधा केंद्र (३७ लाख ९८ हजार), कोल्हापूर (२ कोटी १४ लाख), जयसिंगपूर (९८ लाख ७९ हजार), बेळगाव (७५ लाख), निपाणी (७५ लाख ८३ हजार), कुडाळ (६ लाख २६ हजार), सांगली (६ लाख ४५ हजार), पुणे (१९ लाख ११ हजार), कराड (११ लाख १८ हजार), सांगोला (१३ लाख ४० हजार), चिक्कोडी (१५ लाख ५१ हजार), धारवाड (२० लाख ८६ हजार), शाखेत इतक्या ठेवी जमा झाल्या असून आजअखेर संस्थेकडे ५५० कोटीहून अधिक ठेवी आहेत.
यासाठी संस्थेचे संचालक, शाखा अध्यक्ष शाखा सल्लागार, सीईओ. डी. के. मायदेव, अधिकारी, शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. संस्थे तर्फे ठेवीदार, ग्राहक, सभासद व हितचिंतकांचे आभार मानण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

सिद्धार्थ ढोणे महाराजांच्या भाकणूकीने बेनाडी बिरदेव यात्रेची उत्साहात सांगता

Spread the love  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *