Sunday , September 20 2026
Breaking News

कुटुंबाचा त्याग करून कांशीरामांनी समाजाला दिशा दिली

Spread the love

 

ॲड. राजेंद्र थरकार; मानकापूर येथे जयंतीनिमित्त कार्यक्रम

निपाणी (वार्ता) : बहुजन समाजाचे नायक कांशीराम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य भारतभर सायकलने प्रवास करून बहुजन समाजापर्यंत तळमळीने पोहोचविले आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांची ध्येयधोरणे युवकांना पटवून दिली. कांशीराम यांनी आपल्या कुटुंबाचा त्याग करून ‘बँक बॅलन्स झिरो’सारखे अनेक उपक्रम राबविल्याचे जस्टीस फोरमचे ॲड. राजेंद्र थरकार यांनी सांगितले. मानकापूर येथे आयोजित कांशीराम यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी मच्छिंद्र काडापुरे होते.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन झाले.
निलेश काळे व गीता निलेश काळे यांनी लहान बाळाचे नामकरण भंते अरुणा यांच्या हस्ते झाले. त्रिशरण पंचशील व बुद्ध पूजा भंतेजीच्या हस्ते करून बुद्ध विधी पार पडला. तानाजी घस्ते, सुरेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. निलेश काळे आणि गीता काळे यांना भंतेजींच्या हस्ते संविधानाचे प्रत देण्यात आली.
कार्यक्रमास संजीव हिमकर, संतोष वराळे, कविता कांबळे, जयश्री सावंत यांच्यासह जस्टीस फोरम सदस्य, निपाणी व मानकापूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते. उत्तम माळगे यांनी सूत्रसंचालन केले. निलेश काळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *