Sunday , September 20 2026
Breaking News

भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशन फाउंडेशनतर्फे पर्यावरणासह वाचन चळवळ उपक्रम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : पर्यावरण संवर्धन आणि वाचन संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने निपाणी येथील साई चैतन्य निवासस्थानी सदिच्छा भेट पार पडली. यावेळी नंद्याळ स्मशानभूमीत वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. याशिवाय वाचन चळवळीला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.नंद्याळ येथील स्मशानभूमीत वड, पिंपळ, उंबर यांसारख्या पर्यावरणपूरक रोपांची लागवड करण्यात आली. तसेच ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला. भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशन, संत निरंकारी मंडळ आणि नद्या ग्रामस्थाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशनचे संस्थापक नामदेवराव चौगुले यांनी, अशा उपक्रमामुळे परिसरात हरित पट्टा निर्माण होईल. स्मशानभूमी हरित, स्वच्छ आणि शांततेचा संदेश देणारी पवित्र जागा म्हणून विकसित करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी झालेल्या चर्चेतय हवामान बदल, पाणीटंचाई, जैवविविधतेचे महत्त्व यांसारख्यागंभीर विषयांवर विचारमंथन करण्यात आले. त्याशिवाय वाचन चळवळीच्या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. विशेषतः समशानभूमी ठिकाणी वृक्षारोपण करून तेथे शांत, हरित आणि पक्ष्यांचा अधिवास निर्मितीसह सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न स्तुत्य असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *