Monday , September 21 2026
Breaking News

हिंदू धर्म हा केवळ धर्म नसून तो स्वभाव आहे : मोहन भागवत

Spread the love

 

बेळगाव : संघटित होऊन समाजाचा विकास करणे, विविधता स्वीकारणे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणे हाच खरा धर्म आहे. हिंदू धर्म हा केवळ एक धर्म नसून तो हिंदू स्वभाव आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

चिक्कोडी तालुक्यातील येडूर येथे आयोजित विविध कार्यक्रमांत त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. चिक्कोडी तालुक्यातील येडूर गावात मोहन भागवत यांच्या हस्ते ‘गो तुलाभार’ करण्यात आला, तसेच काडसिद्धेश्वर मठाच्या आवारात नवीन कार्यालयाचे उद्घाटनही पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आज अहंकारामुळे जगात युद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपला हिंदू धर्म सर्वांच्या विकासासाठी झटणारा आहे. “हे विश्वची माझे घर” या भावनेतून आपण सामाजिक कार्य केले पाहिजे, असे मोहन भागवत म्हणाले.

यावेळी श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले की, येडूर तीर्थक्षेत्राच्या इतिहासातील हा अविस्मरणीय क्षण आहे. आज डॉ. मोहन भागवत यांच्या रूपाने ज्ञानाचा कुंभाभिषेक झाला आहे. कोरोना काळात संघाने केलेली सेवा कौतुकास्पद असून युवा पिढीने भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सुसंस्कृत नागरिक बनावे.

याप्रसंगी हुक्केरी मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, नूलचे गुरु सिद्धेश्वर स्वामीजी, श्रीकांत उमराणी यांच्यासह आर.एस.एस.चे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *