Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावच्या पोलीस अधिकाऱ्यांना ‘मुख्यमंत्री पदक’ जाहीर

Spread the love

 

बेळगाव : पोलीस दलातील अतुलनीय सेवा आणि व्यावसायिक चोखंदळपणाबद्दल दिला जाणारा २०२५ या वर्षाचा प्रतिष्ठेचा ‘मुख्यमंत्री पदक’ पुरस्कार बेळगावमधील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना जाहीर झाला आहे.

बेळगाव शहर मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष दयानंद सत्यनायक यांची या पदकासाठी निवड झाली आहे. १९९९ मध्ये पीएसआय म्हणून सेवेत रुजू झालेले सत्यनायक गेल्या २७ वर्षांपासून निष्कलंक सेवा बजावत आहेत. बेळगावसारख्या भाषिकदृष्ट्या संवेदनशील भागात गणेशोत्सव, राज्योत्सव आणि हिवाळी अधिवेशनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू न देता बंदोबस्त हाताळण्याचे कसब त्यांनी दाखवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश आले आहे.

दुसरीकडे, ठसे तपासणी विभागाचे हेड कॉन्स्टेबल बाहुबली ए. अनगाले यांनाही मुख्यमंत्री पदकाचा बहुमान मिळाला आहे. १,००० हून अधिक गुन्ह्यांच्या ठिकाणांना भेटी देणाऱ्या अनगाले यांनी ‘नॅफिस’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ११८ आंतरराज्य गुन्हेगारांचा शोध लावला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे सुमारे ५ कोटी रुपयांचा चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत मिळाला आहे. विशेषतः एका मतिमंद मुलीवरील अत्याचार प्रकरणातील नराधमाला जन्मठेपेची शिक्षा मिळवून देण्यासाठी त्यांनी गोळा केलेले वैज्ञानिक पुरावे अत्यंत निर्णायक ठरले होते. याचसोबत डीएसपी राघवेंद्र हवालदार यांनाही मुख्यमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *