

निपाणी (वार्ता) : धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री. क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि महाद्वार नगरखाना उद्घाटन समारंभ शनिवारी (ता.२८) सहकाररत्न उत्तम पाटील यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यानिमित्त सकाळी मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये धनगर समाज बांधव व महिला सहभागी झाल्या होत्या.
सकाळी स्वामींच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर क्रांतिवीर संगोळी ररायण्णा यांचा जयघोष करण्यात आला.
यावेळी कमिटीतर्फे सहकाररत्न उत्तम पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उत्तम पाटील यांनी, क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे. त्यांचा समवेत इतर समाजाचे योध्देही होते. या पुढील काळातही धनगर समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अरिहंत परिवार कार्यरत राहणार आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या युवकांनी शिक्षणाच्या प्रवाहात येऊन उच्च दर्जाचे शिक्षण घ्यावे. क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचा आदर्श जोपासत त्यांचे शौर्य व बलिदान लक्षात ठेवून समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास संजय चौगुले, बाळासाहेब हेगडे, शिवाजी होनमाने, मारुती कोटे, मंजुनाथ हिरवे, बाबू कोटे, शंकर कोटे, संतोष कोटे, नागेश हिरवे यांच्यासह विविध संघ संस्थांचे पदाधिकारी,आजी, माजी ग्राम पंचायत पदाधिकारी सदस्य, कार्यकर्ते, ग्रामस्थासह धनगर समाज बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta