
संकेश्वर (प्रतिनिधी) : सरकारी शाळांत उत्तम शिक्षणाबरोबर संस्कारही दिले जात असल्याचे क्षेत्र शिक्षणाधिकारी मोहन दंडीन यांनी सांगितले. येथील अंकले रस्ता कन्नड उच्च प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रारंभी प्रास्ताविक भाषण सीआरपी महेश पुजारी यांनी केले. उपस्थितांचे स्वागत शिक्षिका श्रीमती एस. एन. हट्टीकर यांनी तर शाळेच्या प्रगतीचा आढावा शिक्षिका श्रीमती के. एस. राजापूरे यांनी सादर केला. समारंभाचे अध्यक्षस्थान शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष इरफान कागले यांनी भूषविले होते. शिक्षणाधिकारी मोहन दंडीन पुढे म्हणाले, अंकले रस्ता कन्नड उच्च प्राथमिक शाळेने उत्तम प्रगती साधली आहे. शाळेला हव्या असलेल्या खोल्या आपण लवकरच मंजूर करुन देत असल्याचे सांगितले. माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी यांनी शाळेला १५० स्टील ताट, ५० ग्लास आणि १५० वाटी देगणी दिल्याबद्दल माजी नगरसेवक संतोष हतनुरी व अन्य देणगीदार मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर इयता ७ वी वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभही यावेळी पार पाडण्यात आला. समारंभाला नगरसेवक सचिन भोपळे, डॉ. जयप्रकाश करजगी, हास्य कलाकार अजय सारापूरे, सुनिल ओतरी, शाळा सुधारणा समितीच्या उपाध्यक्षा श्रीमती राजेश्री गस्ती, सदस्य गिरीश हुल्लोळी, संतोष लब्बी, समाजसेवक बाळू सुर्यवंशी, बीआरपी विदेश मास्तमरडी, शाळेचे शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एम. एस. सननाईक, श्रीमती आर. एस. भंडारी यांनी केले. आभार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पी. सी. बडिगेर यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta