Tuesday , July 14 2026
Breaking News

संकेश्वरात होळी उत्साहात… नो धुलीवंदन..

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात गुरुवारी रात्री होळी दहन करुन गोड पुरणपोळीचा गोडवा चाखण्यात आला. गावात सर्वत्र होळी दहन करणेचा कार्यक्रम टिमक्यांच्या निनादात आणि शिमगा करीत साजरा होताना दिसला. गावात ठिकठिकाणी सार्वजनिक होळी दहन करण्याचा कार्यक्रम होताना दिसला. येथील मारुती मंदिर जवळ सार्वजनिक होळी परंपरागत पद्धतीने साजरी करण्यात आली. येथे खातेदार साईगौडा पाटील यांच्या हस्ते होळी दहन करण्यात आली. कमतनूर वेसीत गोंधळी समाजाची परंपरागत पद्धतीने साजरी होणारी होळी पहाण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. येथील होळीत कोंबडा मरण्याची प्रथा कायम करण्यात आली. संकेश्वरकरांनी होळीच्या पवित्र अग्नित सर्व दुःखे,चिंता दहन करुन गोड पुरणपोळीचा आस्वाद घेतला.

संकेश्वरात नो धुलीवंदन

शुक्रवार दि. १८ रोजी संकेश्वरात धुलीवंदन नसल्याने रंगांची बरसात कांहीं झाली नाही. मात्र खेडोपाड्यात रंगांची उधळन करण्यात आली. संकेश्वरात रविवार दि. २० रोजी धुलीवंदन- रंगपंचमी एकाच वेळी साजरी केली जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकारितेच्या निष्ठेला मानवंदना, दिवंगत पत्रकार विठ्ठलराव पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन

Spread the love  संकेश्वर (प्रतिनिधी) : समाजातील अन्याय, समस्या आणि सामान्य जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *