Friday , March 6 2026
Breaking News

बाळेकुंद्री दत्त संस्थान विश्वस्तपदी डॉ. संजय पंतबाळेकुंद्री

Spread the love


निपाणी (वार्ता) : बाळेकुंद्री येथील बुधवारी (ता. ६) झालेल्या श्रीदत्त संस्थान क्षेत्र संस्थेच्या स्टँडिंग कमिटी मीटिंगमध्ये दत्त संस्थानचे नवीन ‘ट्रस्टी’ म्हणून डॉ. संजय अरुण पंतबाळेकुंद्री (अक्कोळ) यांची एकमताने निवड करण्यात आली. यासोबत मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून घराण्यातील ज्येष्ठ रंजनदादा पंतबाळेकुंद्री (मुंबई) यांची निवड करण्यात आली.
डॉ. संजय पंतबाळेकुंद्री म्हणाले, आतापर्यत घराण्याच्या ज्येष्ठ दिवंगत मंडळींच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होतो. त्यांचा मोठा आधार होता. त्यांच्या जाण्याने अचानक मोठी जबाबदारी माझ्यावर आली. अनेक हातांचे बळ व प्रेमळ सोबती, घराण्यातील सर्व ज्येष्ठ व्यक्ती माझ्यासोबत असल्याने ही जबाबदारी योग्यरितीने पार पडेन.
बैठकीस श्री घराणे मंडळी, सल्लागार समिती सदस्य, तसेच बेळगांव, निपाणी, कोल्हापूर, सांगली, सावंतवाडी, पुणे, मुंबई, नाशिक, रायगड, जळगांव, विभागातील दत्त संस्थान प्रतिनिधी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव के. एस. पाटील हायस्कूलमध्ये दहावी विद्याथ्यर्थ्यांचा सदिच्छा समारंभ

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील बोरगाव शिक्षण संघाच्या के. एस. पाटील माध्यमिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *