Thursday , March 5 2026
Breaking News

कोगनोळीजवळ ट्रकची विद्युत खांबाला धडक

Spread the love

सुदैवाने जीवित हानी नाही
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर डिव्हायडरच्या मधोमध असणाऱ्या विद्युत खांबाला ट्रकची धडक बसण्याची घटना मंगळवार तारीख 26 रोजी सायंकाळी आठच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरहून बेळगावकडे जाणारा ट्रक येथील कोगनोळी फाट्यावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाच्या मधोमध असणाऱ्या विद्युत खांबाला जोराची धडक बसली. या धडकेमध्ये विद्युत खांब मोडून खाली पडला. यावेळी वीजपुरवठा खंडित असल्याने पुढील अनर्थ टळला.
सदर घटना घडताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कोगनोळी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारून नवी दिशा द्यावी; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक

Spread the love  पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *