रेव्ह. हनोख महापुरे : मिशन कंपाउंडमध्ये वृक्षारोपण
निपाणी (वार्ता) : मानवाच्या सुटीमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्याचा परिणाम पशु पक्षासह नागरिकावर होत आहे. तरीही अजून पर्यावरणाविषयी फारशी जागृती झालेली नाही. त्यामुळे पर्यावरण सुरक्षित राहिले तरच मानवी जीवन सुरक्षित राहणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे, असे मत रेव्ह. हनोख महापुरे यांनी व्यक्त केले. येथील मिशन कंपाउंडमध्ये शिवबसव जयंती व अक्षय तृतीयानिमित्त मिशन कंपाऊंडमधील नागरिक, निपाणी तालुका पत्रकार संघ व सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण मोहिम राबविण्यात आली. यावेळी य वृक्षारोपणाचे महत्व सांगताना महापुरे बोलत होते.
महापुरे म्हणाले, अधिकाधिक नागरिकांनी निसर्ग संवर्धनासाठी पुढे येण्याची गरज आहे . ग्लोबल वॉर्मिंगचा फटका सहन करताना पर्यावरण सुरक्षित राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे . त्याचाच एक भाग म्हणून सदर मोहिम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य व नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. मोहिमे प्रसंगी नगरसेवक संतोष सांगावकर, सुनील वाडकर, दिनेश पाटील, सुनील वडगावे, अभियंता चंद्रकांत पाटील, शीतल भाटले- सडोलकर , सचिन चौगुले, योगेश शिरगुप्पे, रमेश कुरणे, विशाल लाटकर, एस. ए. सकट, सुनील जयकर, सचिन जगताप, डेव्हिड जगताप, देवधन हेगडे, प्रकाश जगताप, विजयमाला जयकर, बेबीताई जगताप, महादेव बन्ने, भानुदास कोंडेकर, राजेश शेडगे, विजय बुरुड, राजेंद्र हजारे, विठ्ठल केसरकर, उत्तम सूर्यवंशी, सिकंदर माळकरी, अजय पोवार, सुधीर प्रताप यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. डेव्हिड तिवडे यांनी आभार मानले.