1998-99 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
कोगनोळी : पहिलीपासून ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व वर्ग मित्रांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा निर्धार करत 1998-99 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक रामचंद्र नवाळे होते. विनायक गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी उपस्थित शिक्षक ए. यु. कमते, कुलकर्णी, ए. पी. कुलकर्णी, तोडकर, एस. बी. पाटील, अनिल दिवटे, सुकांत माने आदींचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
स्नेह मेळाव्यामध्ये 1998-99 सालचे मित्र मैत्रिणी 22 वर्षांनी मोठ्या संख्येने एकत्रित जमले होते. व ज्या शिक्षकांच्या प्रेरणेने आज विविध क्षेत्रांमध्ये उच्च विभूषित कार्यरत आहेत. अशा सर्व माजी विद्यार्थ्यांचा उपस्थित माजी शिक्षक मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी व्ही. व्ही. कुलकर्णी, ए. यु. कमते, प्रदीप शिंत्रे, विनायक गायकवाड, मीनाक्षी सोळांकूरे आदींनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्ष आर. के. नवाळे यांनी शाळेच्या जुन्या-नव्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी माजी विद्यार्थी पद्मराज खोत, सागर लंगरकांडे, दादासो माणगावे, माजी सैनिक संदीप हळीज्वाळे, राजेंद्र दिवटे, रामदास जगदाळे, संजय जगदाळे, मधुकर आबणे, संजय ऐवाळे, अशोक दिवटे, प्रदीप शिंत्रे, संतोष पाटील, सुजित गुरव, सचिन पोवार, प्रमोद जगताप, पद्मा मानगावे, मीनाक्षी सोळांकूरे, त्रिशला माणगावे, सुचिता चौगुले, मनीषा गिरगावे, चेतना मेंगाणे, रूपाली पाटील, सविता पाटील, उज्वला जाधव, प्रेमा मगदूम, शीला पाटील, स्वप्नाली भोसले, श्रीमंती मानगावे, सुनिता माने, नकोशी पाटील, वैशाली ढेंगे, माया चौगुले, निर्मला सूर्यवंशी, गीता पाटील, अनुराधा वठारे, रुपाली पवार, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार संजय जगदाळे यांनी मानले.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …