Monday , September 21 2026
Breaking News

सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून मृत्यु झालेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखाचा धनादेश वितरण

Spread the love

बेळगांव : बेळगांव शहरामध्ये दिनांक 19 एप्रिल 2022 रोजी मुसळधार पाऊस व वादळामुळे अंगावर झाड पडल्याने काळी अमराईतील प्रमुख कै. श्री. विजय कोल्हापुरे यांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून रु. 5,00,000/- (रु. पाच लाख) चा भरपाईचा धनादेश आमदार अनिल बेनके यांनी दिला.
यावेळी आमदार अनिल बेनके म्हणाले की, गेल्या महिन्यात मुसळधार पाऊस व वादळामुळे झाडे पडून बर्‍याच वाहनांचे नुकसान झाले होते. तसेच काळी अमराईचे प्रमुख कै. श्री. विजय कोल्हापुरे यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. त्यामुळे सरकारकडून भरपाईचा धनादेश म्हणून त्यांची पत्नी रेणुका विजय कोल्हापुरे यांना रु. 5,00,000/- (रु. पाच लाख) देण्यात आला. व त्यांना वैयक्तिक क्षमतेनुसार मदत करण्याचे आश्वासन दिले.
या संदर्भात बेळगांव तहशिलदार आर. के. कुलकर्णी, महसूल निरिक्षक जगदीश पकाली, मृतांचे कुटुंब सदस्य, राहुल खुडे, गजानन मिसाळे, विक्रम किल्लेकर, विकास माने, रामा घाटगे, सुरेश अवळे, लता पोटराज व इतर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *