निपाणी (वार्ता) : केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, कर्नाटक युवक काँग्रेस अध्यक्ष महमद नालपाड, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री विरकुमार पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांच्या आदेशान्वये निपाणी ब्लॉक युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अवधूत गुरव यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर काँग्रेस कार्यालयात गुरव यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
गुरव यांनी नेतेमंडळीनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. काँग्रेस पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. यावेळी प्रशांत हंडोरे, अमृत ढोले, धिरज वाडकर, प्रदीप सातवेकर, इंद्रजित बगाडे, विशाल डाफळे, रोहित यादव, बाळासाहेब कमते, प्रकाश इंगवले यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta