Thursday , March 5 2026
Breaking News

निपाणीतील बुधवारी पोलिस ठाणे इमारतींचे उद्घाटन गृह मंत्र्यांची उपस्थिती: प्रशासनाकडून तयारी पूर्ण

Spread the love
निपाणी (वार्ता) : येथील मंडल पोलीस निरीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात  येणाऱ्या शहर व ग्रामीण या दोन पोलिस ठाण्यांच्या नूतन सर्व सोयींनीयुक्त इमारतींचे बांधकाम आठवड्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. या इमारतींचे उद्घाटन बुधवारी (ता. ६) होणार आहे. या कार्यक्रमासाठी गृहमंत्री अरगज्ञानेंद्र, पालकमंत्री गोविंद कारजोळ  धर्मादाय खात्याचा मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण सुद, अतिरिक्त पोलिस महासंचालक अलोकुमार, उत्तर विभागाचे आयजीपी एन. सतीशकुमार, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत. पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.
या इमारतींसाठी मंत्री शशिकला जोल्ले खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्य सरकारने ४ कोटींचा निधी मंजूर केला. यापैकी २ कोटी ७० लाख रुपये खर्चून शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता या दोन पोलिस ठाण्यांच्या इमारतीचे उद्घाटन गृहमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर कुडची व ऐगळी येथील पोलिस ठाण्यांच्या इमारतींचेही उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारून नवी दिशा द्यावी; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक

Spread the love  पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *