मत्तीवडे येथील शाळकरी मुलांचा समावेश
कोगनोळी : इरुमुंगलीच्या बिया खाल्याने मत्तीवडे (तालुका निपाणी) येथील चार शाळकरी मुलांना विषबाधा झाली आहे. त्यातील दोन मुले अत्यावस्थ आहेत. तर दोन मुले किरकोळ आहेत. त्यांच्यावर कागल येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने मुले खेळत होती. खेळता-खेळता त्यातील चार मुलांनी इरुमुंगलीच्या बिया खाल्ल्या. यामध्ये सुमित रमेश मोरे (वय – १६), समर्थ कुमार पोवार (वय – १४), कार्तिक कुमार पोवार (वय – १२), शुभम संजय राजगिरे (वय – १४) या चौघांना उलट्या आणि जुलाब याचा त्रास होऊ लागला. तात्काळ त्यांना कागलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांना पाठविण्यात आले.
यापूर्वीही मत्तीवडे गावातील मुलांनी चार महिन्यापूर्वी असाच प्रकार केला होता. त्यामुळे पालकांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Check Also
गट, तट विसरून शेतकऱ्यांनी एकत्रित यावे
Spread the love राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत जत्राट मध्ये बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून …