14 वर्षांची परंपरा : वारकर्यांच्या लक्षणीय सहभाग
निपाणी : आषाढी वारीनिमित्त बुदिहाळ येथील वारकर्यांची दिंडी पंढरपूरला रवाना झाली. यावर्षी दिंडीचे 14 वे वर्ष असून त्यामध्ये वारकर्यांचा लक्षणीय सहभाग होता. यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली.
प्रारंभी रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते दिंडी वाहनांचे पूजन करण्यात आले. यावेळी पोवार यांनी, माणसाने दररोजच्या धावपळीत अध्यात्मासाठी थोडा वेळ देणे आवश्यक आहे. अध्यात्मामुळे शरीर व मन स्थिर होण्यास मदत होते. सध्या अजूनही पावसाला सुरुवात झाली नसल्याने यंदा समाधानकारक पाऊस होऊन शेतकर्यांचे पीक उदंड पिकू दे यासाठी विठ्ठलाला साकडे घालत असल्याचे सांगितले. यावेळी टाळमृदुंग व विठ्ठल नामाच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून पायी दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
दिंडी प्रस्थानप्रसंगी बाळकृष्ण पाटील अनिल संकपाळ, रमेश पाटील-भोज, आप्पासाहेब गुरव, विनोद पाटील, अशोक सूर्यवंशी, सदाशिव मगदूम, दिनकर मांगोरे बाबुराव पोवार, बाळू खोत, दत्तात्रय मिसाळ, चंद्रकांत पाटील, दादासाहेब देसाई, शहाजी पिसे, जगन्नाथ पिसे, संतोष क्षीरसागर यांच्यासह वारकरी ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
निपाणी सीमेवर कोल्हापूर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रोखले!
Spread the love निपाणी : दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही महाराष्ट्र एकीकरण समितीने कर्नाटकमधील हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात …