कोगनोळी : हदनाळ तालुका निपाणी येथील कैलासवासी विठ्ठल ज्ञानू राजगुडे वय 79 वर्षे यांच्या निधनानंतर बाराव्या दिवशी पारंपारिक पद्धतीना फाटा देत गावातील सुमारे शंभर वारकऱ्यांना ज्ञानेश्वरीचे वाटप केले. मराठी शाळेतील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना 1000 वह्यांचे वाटप केले. तसेच मतिवडे येथील भारतीय सेवा आश्रमास ब्लॅंकेट भेट व खाऊचे वाटप करून बारावे केले.
कैलासवाशी विठ्ठल ज्ञानू राजुगडे यांचे 27 जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते. बाराव्या दिवशी फोटो पुजन करून विविध सामाजिक उपक्रम राबवले.
यावेळी बाबुराव राजूगडे, तुकाराम राजगुडे, सखाराम राजुगडे, प्रकाश राजगुडे, जी. एस. पाटील (शिक्षक नेते), पांडुरंग रावणसर, सिताराम राजुगडे, रंगराव शेटके, आनंदा यादव, धनाजी पाडेकर, तुकाराम शेटके, संभाजी पाटील, दिपक पाडेकर, दिलीप पाटील, मधुकर पाटील, संदीप कांबळे, राजाराम पाटील, बाबुराव पाटील, हिंदुराव पाटील, हिंदुराव कांबळे, संजय शेटके, मतिवडे ग्राम पंचायत सदस्य राजू डोंगळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश पाटील व सर्व सदस्य, प्रभारी मुख्याध्यापक प्रकाश कांबळे सर व शिक्षक वृंद, भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta