Monday , December 8 2025
Breaking News

कागिनेले येथे बुधवारी महासंस्थान गुरुवंदना कार्यक्रम

Spread the love
समाज बांधवांनी उपस्थित रहावे: लक्ष्मण चिंगळे यांचे आवाहन
निपाणी (वार्ता) : कागिनेले महासंस्थान, कनकगुरुपिठाचे प्रथम जगत्गुरु बिरेंद्र केशव तारकानंदपुरी महास्वामीजी यांचे १६ वे पुण्यस्मरण व गुरुपोर्णिमेनिमित्त गुरुवंदना कार्यक्रम बुधवारी (१३) सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे. यावर्षी बेळगांव जिल्हा धनगर समाज बांधवाकडून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी पावनसानिध्य श्रीमद् जगद्गुरु रेवणसिध्देश्वर सिंहासनाधिश्वर परमपूज्य जगद्गुरु श्री. निरंजनानंदपुरी महास्वामीजी, श्री क्षेत्र कागिनेले हे भूषवणार आहेत. यावेळी ईश्वरानंदपूरी महास्वामी, परमपूज्य शिवानंदपूरी महास्वामी, परमपूज्य सिध्दरामानंदपूरी महास्वामी, राज्यातील धनगर समाजाचे सर्व आजी माजी आमदार, मंत्री व समाजाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समाजाचे बेळगाव जिल्हा प्रमुख लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली.
 यावेळी कागिनेले मठातून प्रारंभ केलेल्या आय्. एस्. कोचिंग सेंटर  डिजीटल ग्रंथालयासाठी ११ लाख व स्कूल बससाठी सुमारे २३ लाख रुपये देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्या दिवशी स्वामीचे गुरुवंदना कार्यक्रम, मान्यवरांचा सत्कार व महाप्रसाद व्यवस्था बेळगांव जिल्हा धनगर समाजाकडून करण्यात आलेली आहे. यासाठी जिल्ह्याचे नेते व माजी विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील, कर्नाटक राज्य धनगर समाजाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, डॉ. राजेंद्र सण्णक्की, मड्याप्पा तोळीन्नवर, जनरल सेक्रेटरी ऍड. एच्. एस्. नसलापुरे, सिध्दलिंग दळवाई, एस्. एफ. पुजारी, वसंत दळवाई, बसवराज बसळीगुंदी, शंकरराव हेगडे, अजित बनहट्टी, समाजाचे राज्य घटकाचे संचालक, तालुका अध्यक्ष व समाजातील प्रमुख नेते मंडळी या सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यातील १४ तालुक्यामधून प्रत्येक गावातून या कार्यक्रमासाठी समाजबांधवानी तन-मन-धनाने सहकार्य केलेले आहे.
 कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बेळगांव जिल्ह्यातील प्रत्येक गावातून कागिनेले (हावेरी जिल्हा) येथे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कर्नाटक राज्य धनगर समाजाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *