Thursday , March 5 2026
Breaking News

कोगनोळी तिहेरी अपघातात वाहनांचे नुकसान

Spread the love

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या आरटीओ ऑफिस जवळ तिहेरी अपघातात वाहनांचे नुकसान झाल्याची घटना सोमवार तारीख अकरा रोजी सायंकाळी पाच वाजता घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की,  बेळगावहून कोल्हापूरकडे जात असणाऱ्या आयशर ट्रकने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या आरटीओ ऑफिस येथे अचानक ब्रेक मारल्याने बेळगावहून कोल्हापूर कडे जात असलेल्या कर्नाटक महामंडळाच्या बसची आयशर ट्रकला जोराची धडक बसली. बस पाठोपाठ येणाऱ्या दुधाच्या टँकरची बसला जोराची धडक बसली. झालेल्या तिहेरी अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनास्थळी निपाणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक  विजय पाटील यांनी भेट देऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीस खुला करून दिला.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारून नवी दिशा द्यावी; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक

Spread the love  पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *