निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धाच्या माध्यमातून आषाढी एकादशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी स्नेहा घाटगे होत्या तर मुख्य अतिथी म्हणून वसंत शंगोळे -गुरुजी, तबलावादक नसीर मुल्ला, हेमंती ओबले, संदिप इंगवले यांची उपस्थिती होती.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यासाठी वेशभूषा, पहिली ते चौथी विद्यार्थ्यासाठी उपवासाचे पदार्थ स्पर्धा, 5 वी ते 9 विद्यार्थ्यासाठी भजन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी मंत्रमुग्ध होवून भजनाचा आनंद घेतला. माऊली माऊली… ने शाळा दुमदुमली होती. प्राचार्या स्नेहा घाटगे यांनी, पंढरपुरच्या वारीचे महत्व सांगून एकादशीचा उपवास शरीरासाठी कसा वैज्ञनिक दृष्ट्या महत्वाचा आहे, हे सांगून आपली परंपरा टिकविण्याचे आवाहन केले. पार्थ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अश्वजीत कांबळे याने आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta