निपाणी (वार्ता) : बंगळुरुर येथे विफा कप खुल्या राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धा अशोका कन्वेंशन हॉल राजाजी नगर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्ह्यातून निपाणी येथील सद्गुरू तायक्वांदो स्पोर्ट्स अकादमीने १७ सुवर्ण पदक १५ रौप्य पदक तर २ कास्या पदक पटकावले. या स्पर्धा फाईट व फुमसे विभागात आयोजित करण्यात आल्या होत्या.
सब जूनियर विभागात सार्थक निर्मले, रूही बोधले, आरोही बोधले, अवनी कुलकर्णी, सौम्या खोत, समर्थ निर्मले, वेदकुमार कांबळे यांनी यश मिळविले.
जूनियर विभागात तनिष मुरगाली, अथर्व शेळके, कार्तिक चव्हाण, सोनल लिगाडे, पुष्पा पाटील यांनी कॅडेट विभागात शर्वरी फुटाणे, अपूर्वा पवार, साहिल माळगे, सीनियर विभागात प्रथमेश भोसले, गणेश कुलकंती, ओमकार अलकनूरे, आदित्य सोलापूरेयांनी पुमसे व फाईट विभागात सहभाग होऊन सुवर्णपदक रौप्य पदक व कांस्यपदक पटकावले. स्पर्धेमध्ये ७२० हून अधिक मुला- मुलींनी सहभाग घेतला होता.
यशस्वी विद्यार्थ्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बेळगाव जिल्ह्यातून सद्गुरु तायक्वांदो टीमने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल टीम ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना तायक्वांदो मुख्य प्रशिक्षक बबन निर्मले यांचे मार्गदर्शन तर के एल ई सी बी एस ई शाळेचे प्रभारी प्राचार्य बसवराज कडेमनी यांचे प्रोत्साहन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta