निपाणी : महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांनी निपाणी शहर व ग्रामीण भागातील महिलांना बटना सनी कलर करून देण्यासाठी सहा हजार रुपये पगार आणि सभासद करून दिल्यास अतिरिक्त पाचशे रुपये मिळणार असे सांगून शेजारील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील तीन भामटे निपाणी शहरातील शिवाजीनगर या भागातील आणि ग्रामीण भागातील महिलांना कोट्यवधीचा चुना लावून पसार झाले आहेत. या गंडवागंडवीच्या प्रकरणातला मुख्य संशयित अजित हिरवे फरार असून बसवेश्वर चौक पोलीस स्टेशनचे पीएसआय तसेच त्यांचे सहकारी तपास करत आहेत. या फसवणूक प्रकरणातील मुख्य मालक अशोक पाटील इस्लामपूर आणि मॅनेजर प्रताप घाडगे मुरगुड या दोघांना निपाणी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी चालू केली आहे. परराज्यातील लोक येऊन निपाणीसारख्या परिसरामध्ये फसवाफसवीचा धंदा करत आहेत याचा अर्थ असा की या प्रकरणामागे पांढऱ्या कपड्यातील मोठी व्यक्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण परराज्यातील लोकांनी असे धाडस करायचे म्हटल्यास स्थानिक राजकारणी किंवा सामाजिक व्यक्तीचा वरदहस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने तपास चालू झाल्यास नक्कीच सत्य उजेडात येईल असे निपाणी व परिसरातील नागरिकांतून बोलले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करावा असेही नागरिकातून बोलले जात आहे. पोलीस प्रशासनाने योग्य दिशेने तपास करून आर्थिक व्यवहारामध्ये बुडालेल्या माता-भगिनींना आधार देऊन त्यांचा संसार वाचवावा, अशी मागणी फसवणूक झालेल्या काही महिलांमधून ऐकावयास मिळत आहे.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …