“आयुर्वेद” आरोग्य शिबीराचा लाभ जनतेने घ्यावा
निपाणी (वार्ता) : आयुर्वेदाचा प्रसार पाश्चात्य देशात ही मोठ्या प्रमाणात झाला आहे. भारतीय वेदकालीन परंपरेपासून आयुर्वेदाच्या क्षेत्रात सुश्रुत, चरक या सारख्या ऋषीमुनींनी मोलाची भर घातली आहे. आज आयुर्वेद ही काळाची गरज बनली आहे. आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने निपाणी नगरीतील जुन्या पिढीतील आयुर्वेदाचार्य वैद्य मच्छिंद्रनाथ चिकोडे व ज्योतिषाचार्य गोरखनाथ चिकोडे यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षा निमित्त निपाणीत मोफत आरोग्य शिबीर व श्रावण मासानिमित्त नाशिक येथील वेदशास्त्र संपन्न पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांचे श्रीमद् भगवद् गीता या वर प्रवचन मराठा मंडळ सांस्कृतिक भवन निपाणी येथे आयोजित केले आहे. शनिवारी (३०) व रविवार (ता.३१) या दोन दिवसात शिबिर व प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याचा लाभ सर्वानी घ्यावा. ही आयुर्वेदिक औषधे वापरून व्याधीचे समुळ उच्चाटन करा. तसेच या सामाजिक व धार्मिक उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमंत राजमाता जिजाऊ फौंडेशन अर्जुन नगर निपाणी मार्फत श्रीमंत विजयराजे देसाई निपाणीकर सरकार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
पत्रकार परिषदेस बबन घाटगे, किरण कोकरे, इंद्रजित जमादार, किरण पाटोळे, यशोधन तारळे, अजित भोकरे ओमकार घोडके, महादेव मोरे, संदीप,ओमकार लाटकर, संदिप यादव, विजय जामदार, बंटी बिसुरे, महेश घोडके, सुंदर खराडे, रमेश मोरे, सुयश चिकोडे, राज कांबळे, वासीम फरास उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta