अध्यक्ष उत्तम पाटील : श्रीवर्धन इजारे प्रथम
निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यम सीबीएसई पॅटर्नचे ज्ञान मिळावे. विद्यार्थी उच्चशिक्षित व्हावेत, यासाठी सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या आर. ए. पाटील पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती शाळेचे अध्यक्ष, युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली.
शाळेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
उत्तम पाटील म्हणाले, सध्या शिक्षण क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. त्यामध्ये विद्यार्थी सर्व गुण संपन्न व्हावा, यासाठी अरिहंत रुरल डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याबरोबरच उच्च शिक्षण देत आहोत. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही सीबीएससी पॅटर्नचे इंग्रजी माध्यम शिक्षण मिळावे या उद्देशाने आर. ए. पाटील पब्लिक स्कूलचे स्थापना केली. प्रत्येक वर्षी शिक्षण क्षेत्रात होणारे अमुलाग्र बदल, स्पर्धात्मक शिक्षण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना संगीत क्षेत्राचे ज्ञान, विविध संस्कृती कार्यक्रम, क्रीडा स्पर्धेचे आयोजन, विविध शिबिरांचे आयोजन, विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे म्हणून आठवडी बाजाराचे आयोजन, विविध स्पर्धा व कार्यक्रम आयोजन करण्यात येत आहे .
सन २०२१-२२ सलाच्या दहावीच्या परीक्षेत शाळेतून एकूण ३२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १५ विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणीत, ११ विद्यार्थी प्रथम श्रेणी व ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. श्रीवर्धन इजारे यांने ९२.२ टक्के गुण मिळवून प्रथम, प्रांजली पाटील हिने ९०.४ टक्के गुण मिळवून द्वितीय व नेत्रा ईरोळे हिने ८९.६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
यावेळी संस्थेचे संस्थापक रावसाहेब पाटील, सचिव अभिनंदन पाटील, संचालिका मीनाक्षी पाटील, विनयश्री पाटील, धनश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, प्रशासक बाळासाहेब हावले, प्राचार्य शमिका शहा, कोऑर्डिनेटर सुजित उळागडे, यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta