सौंदलगा : येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा हालसिध्दनाथ नगर सौंदलगा येथे पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनिल शेवाळे यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर पेव्हर ब्लॉक बसविण्याचा कामाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कोगनोळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना दादासाहेब कोगनोळे म्हणाले की, एमजी एन.आर.जी. या फंडातून सौंदलगा ग्रामपंचायत कडून हालसिद्धनाथ नगर मधील मराठी शाळेमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत असून यामुळे शाळेच्या वैभववात भर पडण्यात येत आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनोद माने, विक्रम पाटील, चंद्रकांत पाटील-सुभान, अनिता शेवाळे, एसडीएमसी अध्यक्ष महेश गाडीवड्डर, पुंडलिक शेवाळे, मुख्याध्यापक एम.डी. जबडे, व्ही.बी. गुरव, पी.पी. कुंभार हे उपस्थित होते. शेवटी आभार ए.एम. माने यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta