निपाणी (वार्ता): येथील जत्राट वेस ₹मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भावनाजवळ असलेल्या नवीन शेरखाने त्यांच्या घराला दुपारी शॉर्टसर्किटने आग लागून त्यामध्ये संसार उपयोगी साहित्य खाक झाले आहे. या घटनेत शेरखाने यांचे २५ हजार रुपये नुकसान झाले आहे. परिसरातील नागरिकांनी पाण्याचा मारा करून तात्काळ आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, जत्राट वेस आंबेडकर भवन जवळील भोसले यांच्या घरी नवीन शेरखाने हे आपल्या आई समवेत भाडोत्री राहत आहेत. शेरखाने हे चप्पल तयार करण्याच्या कारखान्यात कामाला असून आई घरीच असते. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते कामावर होते तर आई कामानिमित्त घराबाहेर होत्या. त्याचवेळी शॉर्टसर्किटने घराच्या चौकटीला आग लागली. आगीची घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात येतात त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. तोपर्यंत घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. घटनेची माहिती दिल्यानंतर हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नगरसेविका प्रभावती सूर्यवंशी व सामाजिक कार्यकर्ते महेश सूर्यवंशी यांनीही भेट देऊन पाहणी केली. शेरखाने यांची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी नगरसेविका सूर्यवंशी यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta