कोगनोळी : कोगनोळीजवळ मोटरसायकलचा झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील एकजण व कुत्रे ठार झाल्याची घटना सोमवार तारीख एक रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली.
शक्ती भिवाजी कुंभार (वय 40) राहणार बोर पाडळी, तालुका पन्हाळा असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या अपघातात प्रतीक दिलीप रसाळ (वय 34) राहणार पेटवडगाव हे किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून व पोलिसांच्या कडून मिळालेले अधिक माहिती अशी की, शक्ती कुंभार व प्रतीक रसाळ हे दोघेजण आपली मोटरसायकल घेऊन निपाणीकडून कोल्हापूर कडे जात होते. राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोलनाका जवळ असणाऱ्या प्रसाद नर्सरी येथे अचानक मोटरसायकलीच्या आडवे कुत्रे आल्याने मोटरसायकलची कुत्र्याला जोराची धडक बसली.
मोटरसायकल नियंत्रण सुटून खाली पडली. यामध्ये शक्ती कुंभार यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तर प्रतीक रसाळ हे किरकोळ जखमी झाले. मोटर सायकलची जोराची धडक बसल्याने कुत्रेही जागीच ठार झाले आहे. घटनास्थळी कोगनोळी पोलीस स्टेशनचे बीट हवलदार राजू गोरखनावर, शिवप्रसाद व अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात शुभविच्छेदनासाठी पाठवून दिला.
Belgaum Varta Belgaum Varta