Wednesday , March 4 2026
Breaking News

निपाणीत शनिवारी मोफत पोट विकारावर शिबिर

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि निपाणी रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने लिव्हरतज्ञ, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. संतोष हजारे यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर रोटरी हॉल निपाणी येथे होणार आहे.
शनिवारी (ता.6) सकाळी 10 वाजल्या पासून दुपारी 1 वाजेपर्यंत पोट दुखी, लिव्हरला सुज येणे, पोट फुगणे, गॅस, असिडिटी, अपचन, बद्धकोष्टता, हिपॅटायटिस (काविळ), लठ्ठपणा, पोट साफ न होणे, लहान आणि मोठया आतड्याचे अल्सर, लिव्हर किंवा पित्ताशयाचे आजार याकरिता मोफत तपासणी करून सल्ला घेणार आहेत.
तरी गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेळगाव के. एल. ई. संस्थेचे संचालक अमर बागेवाडी यांनी पत्रकाद्वारे केले आहेत. यावेळी निपाणी रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पठाडे, सेक्रेटरी आशिष कुरबेट्टी, खजिनदार चेतन लगारे, के. एल. ई रोटरी हेल्थ केअर सेंटरचे अध्यक्ष सचिन देशमाने यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारून नवी दिशा द्यावी; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक

Spread the love  पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *