शेकडो वर्षाची परंपरा : सोमवारी विसर्जन सोहळा
निपाणी (वार्ता) : येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यामध्ये शेकडो वर्षाची परंपरा आज देखील कायम आहे. निपाणी व परिसरामध्ये पूर्व पंजे व पीर बसविण्याचा कार्यक्रम गुरुवारी (ता.4) प्रारंभ झाला. त्यानंतर निपाणकर राजवाड्यामध्ये देखील पीर व पंजे बसवून समीर मुजावर यांनी भक्ती भावाने पूजन करून निपाणकर राजवाड्यामध्ये बसविले. त्यानंतर निपाणकर घराण्याचे वंशज पाच दिवस पूजा करीत आहेत.
यावेळी श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या शुभहस्ते पिरांचा पोशाख चढवून त्यांची मनोभावे पूजा करण्यात आली. तसेच नैवेद्य म्हणून मलिदा व दही भाताचा नैवेद्य दाखवण्यात आला.
यावेळी शिवाजी भोई, गजानन भोई, शिवम भोई, पांडूरंग भोई, नरेंद्र कोरवी, अभी कांबळे, गणेश कोरवी, सुरेश शेटके, सुहास बकरे, हिंदुराव स्वामी, संजय पारळे, राजू कोरवी साजिद पटेल, समीर तोरगल उपस्थित होते. सोमवारी (ता.7) सकाळी शहरातील सर्व पीर पंजे व निपाणकरांचे मानाचे ताबूत निपाणीतील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी निपाणकर राजवाड्यामध्ये गावातील सर्व पिर पंजे येऊन सांगता होणार आहे. पीर पंजे अंमझलरी तळ्यामध्ये विसर्जित केले जाणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta