सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कुरली येथे झालेल्या विभागीय पातळीवरील विविध क्रीडा स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत अनेक विभागांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून विद्यालयाची क्रीडा परंपरा जोपासलेली आहे.
या विद्यालयाने प्रत्येक वर्षी खेळामध्ये विविध ठिकाणी उत्तुंग कामगिरी केलेली आहे.
विद्यार्थिनींच्या खेळामध्ये यशस्वी झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे
200 मीटर धावणे व लांब उडी वर्धा कासारप्रथम तर वर्षा बेनाडे ही 400 मीटर धावणे मध्ये प्रथम क्रमांक लांब उडी मध्ये द्वितीय क्रमांक, चालण्याच्या स्पर्धेमध्ये साक्षी कुंभार प्रथम, 100 मीटर धावणे वैष्णवी बेनाडे द्वितीय, पंधराशे मीटर धावणे आसावरी भेंडुगळे तृतीय तसेच मुलींच्या रीले ग्रुपने प्रथम क्रमांक मिळवला.
तर हायस्कूलच्या मुलांच्या मध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले, २०० मीटर धावणे प्रतीक मोरे प्रथम, ८०० मीटर धावणे श्रेयस पाटील प्रथम, पंधराशे मीटर धावणे आदित्य पाटील द्वितीय, गोळाफेक संकेत कुंभार द्वितीय, साखळी गोळा फेकणे सोहन पाटील द्वितीय तर लांब उडी संकेत कुंभार तृतीय व अविष्कार तांबेकर 100 मीटर धावणे तृतीय क्रमांक वरील प्रमाणे विविध खेळात खेळाडूंनी यश संपादन करत तालुका पातळीवर आपली निवड सार्थ केली.
या सर्व विद्यार्थ्यांना बेटरमेंट कमिटी चेअरमन रघुनाथ चौगुले, मुख्याध्यापक जे. एस. वाडकर यांची प्रेरणा मिळाली तर क्रीडा शिक्षक बी. एम. शिंत्रे यांचे व सर्व शिक्षक, टीम मॅनेजर रूपाली शेवाळे अनेक माजी विद्यार्थी खेळाडूंचे मार्गदर्शन लाभले. वरील सर्व खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta