
निपाणी : निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटना निपाणी यांच्या वतीने 75 वा अमृतमहोस्तव स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करणेत आला.
प्रथम मध्यवर्ती रिक्षा संघटनेचे कायदे सल्लगार श्री. प्रवीण जोशी सर यांच्या शुभहस्ते भारत मातेचे पूजन करणेत आले.
रिक्षा संघटनेचं सभासद 1972 च्या भारत- पाकिस्तान युद्धामध्ये सक्रिय सहभाग असलेले मेजर श्री. काशिनाथ कंग्राळकर आणि सध्या भारतीय सेनेमध्ये देशसेवेसाठी कार्यरत असलेले जवान श्री. अक्षय मधुकर कागलकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करणेत आले.
30 वर्षे कोणताही अपघात न करता आपले लायसन आणि आपल्या गाडीचे सर्व पेपर्स क्लिअर असलेले अश्या ज्येष्ठ रिक्षा चालक श्री. बंडा रामनकट्टी, अनंत घोडके, यासिन हवालदार, प्रमोद हिरेमठ यांचा शाल श्रीफळ आणि फेटा बांधून सत्कार करणेत आला तसेच रिक्षा चालकांच्या हुशार आणि परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या मुलांचा त्याना शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करणेत आला.
प्रमुख पाहूणांच्या शाल, श्रीफळ देऊन सत्कार करणेत आला उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि संघटनेच्या कार्याचा गौरव केला.
मध्यवर्ती रिक्षा संघटना अध्यक्ष श्री. गजानन खापे आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले.
रशीद शेख यांनी देशभक्तीपर गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली सर्व उपस्थितांना मिठाई आणि जिलेबी देणेत आली.
यावेळी उपाध्यक्ष श्री. प्रवीण झळके, सेक्रेटरी निशांत हिरेमठ, खजिनदार संजय शास्त्री यांच्यासह संघटनेचे सर्व संचालक असंख्य सभासद तसेच माजी नगरसेवक नंदकुमार कांबळे, शेखर वांद्रे, राजेश तिळवे, अरुण चव्हाण, रवी बागल बाळ भोसले, राजेश आवटे आणि नरवीर तानाजी चौकातील सर्व नागरिक व्यापारी मित्र मंडळ आणि देशभक्त उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta