
कोगनोळी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील आरटीओ ऑफिस व पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर झालेल्या दुहेरी अपघातामध्ये दोघेजण जखमी झाले. त्यापैकी एक जण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री 9 च्या दरम्यान येथील आरटीओ नाक्या समोर मोटारसायकल स्वाराचा किरकोळ अपघात झाला. विनोद भिमराव दावने (वय 58) राहणार आडी तालुका निपाणी असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नांव आहे.
पुढे सुमारे आर्धा किलोमीटर मोटारसायकल अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून सुरज धनपाल उपाध्ये (वय 28) राहणार अक्कोळ तालुका निपाणी असे गंभीर दुखापत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अपघातातील जखमींना प्रथमोपचारासाठी रूग्णवाहीकेतुन निपाणीतील गांधी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
घटनास्थळी कोगनोळी पोलीस स्टेशनचे बिट हवालदार राजु गोरखनावर व शिवप्रसाद यांनी घटनास्थळी दाखल होऊन महामार्गावर झालेली वाहतुकीची कोंडी सुरळीत केली.
Belgaum Varta Belgaum Varta