संगोळी रायण्णा मंडळातर्फे आयोजन : सायंकाळी मिरवणूक
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील संगोळी रायण्णा युवक मंडळातर्फे संगोळी रायान्ना जयंती निमित्त बेनाडी बिरदेव माळावर आनंद मैदानात आयोजित बकर्याच्या टकरीत सांगली येथील येथील हुसेन पटेल यांच्या बकर्याने प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना 5 हजार एक रुपयाचे बक्षीस घेऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या टकरीत आर. खरबुडे-निढोरी आणि बाळूमामा प्रसन्न नेसरी यांच्या बकर्यांनी द्वितीय व तृतीय क्रमांकाची 3001, 2001 रुपयांची बक्षिसे आणि ढाल निशान पटकाविले.
बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते या मैदानाचे उद्घाटन झाले.
खुल्या गटात रॉकी ग्रुप करिचंद (शिरोली ए), समर्थ कांबळे- कागल आणि रॉकी ग्रुप (शिरोली बी) यांनी प्रथम ते तृतीय क्रमांकाची 7001, 5001 आणि 3001 रुपयांची बक्षिसे व ढाल निशान पटकाविले बक्षिसे पटकावली. आडी येथील मुरारी बन्ने यांनी परीक्षक म्हणून काम केले.
प्रारंभी युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते संगोळी रायान्ना यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. मंडळाचे अध्यक्ष अविनाश हजारे यांनी स्वागत तर उपाध्यक्ष लखन जानकर यांनी प्रास्ताविक केले. उत्तम पाटील यांनी, धनगर समाजामधील युवकांनी शिक्षणाला प्राधान्य देऊन विविध क्षेत्रात कार्य करावे. क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांनी स्वातंत्र्य पूर्व लढ्यात दिलेले योगदान महत्त्वाचे असून त्यांचे स्मरण नेहमी करण्याचे आवाहन केले.
सायंकाळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते संगोळी रायण्णा यांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमास खडकलाट येथील उद्योजक राजेंद्र पोतदार, रमेश पाटील, अरुण जावीर, ग्रामपंचायत सदस्य शहाजी पाटील, प्रभाकर मधाळे, सागर पिंपळे, महादेव लवटे, तानाजी हजारे, दत्ता ढवणे, पुंडलिक ढवणे, किरण जडगनावर, संजय ढवणे, सागर बन्ने, अण्णाप्पा बन्ने, सत्यापा हजारे, अण्णा हजारे, भागोजी बन्ने, आप्पासाहेब ढवणे, बाळू जानकर, लक्ष्मण जानकर यांच्यासह संगोळी रायण्णा युवक मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व धनगर समाज बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta