निपाणी (वार्ता) : विठू माऊली व श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांच्या आशीर्वादाने निपाणीत प्रथमच श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या अश्वाचे गोल व उभे रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रिंगण सोहळा रविवारी (ता. २८) दुपारी म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर होणार आहे. याचा लाभ निपाणीसह परिसरातील वारकरी भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्रीमंत दादाराजे निपाणकर सरकार यांनी केले आहे.
या रिंगण सोहळ्याच्या माध्यमातून रविवारी (ता. २८) सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वर माऊलींचे पारायण होणार आहे. सकाळी निपाणीकर वाड्यातून दिंडी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. यामध्ये माऊलीचे अश्व, पालखी व वारकरी उपस्थित राहणार आहेत. म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर गोल रिंगण सोहळा तर सटवाई रोड कॉर्नर ते राम मंदिर दरम्यान उभे रिंगण सोहळा आयोजित केले जाणार आहे. त्यानंतर निपाणकर वाड्यात महाप्रसादाचे वितरण होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta