Wednesday , December 10 2025
Breaking News

नगरसेवकाने स्वखर्चाने बसवले पथदीप

Spread the love

 

शौकत मणियार यांचा उपक्रम : नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे घेतला निर्णय
निपाणी (वार्ता) : शहराबाहेरील वॉर्ड नंबर 19 मधील संभाजीनगर परिसरात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या परिसरात मूलभूत सुविधा देण्याची मागणी नगरसेवक शौकत मणियार यांनी नगरपालिका प्रशासनाकडे बर्‍याचदा केली होती. शिवाय संभाजी महाराज बर्‍याच ठिकाणी पथदीप नसल्याने रात्रीच्या अंधारात नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. पण त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्षच झाले. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक शौकत मणियार स्वखर्चाने संपूर्ण वॉर्डामध्ये नवीन पथदीप लावून नागरिकांची होणारे गैरसोय थांबवली आहे.
शहराच्या पश्चिमेला दोन किलोमीटर अंतरावर संभाजीनगर वसले आहेत. या ठिकाणी मध्यमवर्गीय नागरिकांची लोकवस्ती आहे. बर्‍याच महिन्यापासून संभाजीरातील पथदीप, रस्ते, सार्वजनिक स्वच्छता, शौचालयांची दुरावस्था झाली आहे. बर्‍याचदा परिसरातील नागरिकांनी लोक वर्गणी काढून त्यांची दुरुस्ती केली होती. या परिसरात सुविधा देण्यासाठी बर्‍याचदा नगरपालिका अध्यक्ष आणि आयुक्ताकडे तक्रार केली. पण त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे संभाजीनगर परिसरात अंधारात वावरत होता अखेर स्वखर्चाने नगरसेवक मनियार यांनी प्रभागात सर्वच ठिकाणी खराब झालेले पतदीप काढून नवीन पद्धतीत बसविले आहेत त्यामुळे नागरिकांची सोय झाली असून समाधान व्यक्त होत आहे.
त्यामुळे या पुढील काळात तरी नगरपालिका प्रशासनाने मूलभूत सुविधा पासून दुर्लक्षित राहिलेल्या वार्डात कामे करण्याची मागणी नगरसेवक मनियार व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

Spread the love  चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *