निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्ली मधील पुरातन महादेव मंदिरात दिवंगत शिवपुत्रप्पा कोठीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण महिन्यात सलग 21 वर्षे जपनाम कार्यक्रम सेवा सुरू आहे. त्याबद्दल महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीतर्फे सदानंद चंद्रकुडे व मंगल चंद्रकुडे दाम्पत्य, महालिंग काठीवाले, रुमा कोठीवाले दाम्पत्यांचा समाधी मठामधील मठाधीश प्राणलींग स्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल इराण्णा शिरगावे, उमा शिरगावे यांचाही राजेश पाटील, वैशाली पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. सोमवारी (ता.22) महादेव मंदिरात अखेरच्या सोमवारी दादाराजे निपाणकर-सरकार यांच्या हस्ते श्रीमूर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर जपनाम कार्यक्रमास सुरुवात झाली.
यावेळी महालिंग काठीवाले यांच्या हस्ते मंदिरात आरती करण्यात आली.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, केएलई संस्थेचे उपाध्यक्ष अमर बागेवाडी, हालशुगर अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, शिवकांत चंद्रकुडे, मल्लिकार्जुन गडकरी, संजय मोळवाडे, रवींद्र कोठीवाले, बाबासाहेब चंद्रकुडे, बसवराज पाटील, किरण बोरगल्ले, बसवराज बाळीकन्नावर, माजी नगरसेवक रवींद्र चंद्रकुडे, बाबासाहेब साजनावर, सुलोचना पाटील, वर्षा भोपळे, माधुरी चंद्रकुडे, यांच्यासह श्री गणेश मंडळ, श्री महादेव जपनाम मंडळ, निलबिका महिला बळग यांच्यासह भाविक उपस्थित होते.
————————————————————————————————————
बुधवारी महाप्रसाद वाटप
येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात श्रावण महिना निमित्त महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रावण महिन्याच्या समाप्ती निमित्त बुधवारी (24) दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीने दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta