
हंचिनाळ : हंचिनाळ (ता. निपाणी) येथे विजेचा धक्का लागून घराबाहेर सोडलेल्या म्हशीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,
येथील कोगनोळी रोडवर कदम आंब्याजवळ श्री. मधुकर दत्ता पाटील (रामजी) यांचे राहते घर असून ते शेतीसह पशुपालन व्यवसाय करतात. आज सकाळी आठच्या सुमारास म्हैस घराबाहेर सोडलेली असताना नजीकच असणाऱ्या विद्युत खांब वाकु नये म्हणून ताण काढलेल्या तारेला म्हशीचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने म्हैस जागीच गतप्राण झाली. ताण काढलेली तार चुकीच्या पद्धतीने घातल्यामुळे सदर तारेचा स्पर्श खांबावरील तारेला झाल्यामुळे म्हशीचा मृत्यू झाला. सदर घटनेला हेस्कॉमचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती.
श्री. मधुकर पाटील हे अल्पभूधारक असून अत्यंत गरीब परिस्थितीत मजुरी करून जीवन जगतात. त्यांचे सुमारे 60 हजार रुपये किमतीशी म्हैस गेल्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसान झाले आहे. तरी सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
सदर घटनेची पाहणी करण्याकरिता कोगनोळी विभागाचे अभियंता श्री. गोपाळ सर, तारतंत्री अण्णासो कागे. ग्रामपंचायत अध्यक्ष बबन हवालदार, ग्रामविकास अधिकारी गस्ते, पिडीओ नामदेव शिंदे, उत्तम पंचम, बाळासो अनिल मंगसुळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta