Thursday , March 5 2026
Breaking News

बोरगावमधील भंगार दुकान फोडून दहा लाखाची चोरी

Spread the love
सीसीटीव्हीची मोडतोड : परिसरात भीतीचे वातावरण
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री महालक्ष्मी स्क्रॅप मर्चंट या भंगार दुकान फोडून सुमारे दहा लाखांहून अधिक रुपयांचे भंगार चोरट्यानी लंपास केल्याची घटना रविवारी (ता.११) पहाटे उघडकीस आली. चोरट्यानी दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून हार्ड डिस्क गायब करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केले आहे. इतकी मोठी चोरीची घटना घडल्यामुळे बोरगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेले अधिक माहिती अशी, बोरगाव सदलगा रस्त्यालगत प्रकाश गोसावी यांच्या मालकीचे श्री महालक्ष्मी स्क्रॅप मर्चंटचे दुकान आहे. या दुकानात मोठ्या प्रमाणात लोखंड, ऍल्युमिनीयम, तांबे, पितळ, गाड्यांचे मटेरियल असे मोठ्या प्रमाणावर भंगार होते. रात्री प्रकाश गोसावी हे नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून घरी गेले होते. सर्वत्र गणेश विसर्जनचे वातावरण असल्याने या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी प्रकाश गोसावी यांच्या दुकानाच्या मागील बाजूस जाऊन कुलूप तोडून आत प्रवेश केला. आत प्रवेश करण्याआधी त्यांनी चारी ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीची तोडफोड केली. त्यानंतर दुकानातील महत्त्वाचे असलेले भंगारमधील तांबा व पितळेचे सुमारे पाच लाख किमतीचे साहित्य, एक टन गाड्यांचे फाटे, ५० हजार हून अधिक किंमतीचे ऍल्युमिनीयम, नवीन भांडी, तीन शेळी आणि गाड्यांची इंजन, लोखंडी व भीड असे सुमारे दोन टन अशी एकूण दहा ते बारा लाखांहून अधिक किंमतीचे साहित्य चोरट्यानी लंपास केले आहे. चोरी केलेल्या घटनेच काही पुरावे मिळू नयेत म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा बरोबरच त्यामधील हार्डडिस्कही चोरट्यानी लांबविले आहे. रविवारी सात वाजता त्यांचे बंधू उत्तम गोसावी या ठिकाणी आले असता चोरी झाल्याचे लक्षात आले आहे.
आठवड्यापूर्वीच बोरगाव माळ भागावर चोरट्यानी चोरी करीत त्या ठिकाणीही सोने व रोकड लंपास केल्याची घटना ताजी असताना पुन्हा चोरट्यानी भंगार दुकाने फोडून सुमारे दहा लाखांहून अधिक साहित्य लांबविल्याने बोरगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसापूर्वीच येथील कुंभार तलावाजवळ रात्रीच्या वेळेस काही नागरिकांनी चोरट्यांना बघितले असल्याची चर्चाही गावात आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळी बंदोबस्त वाढवून गस्त वाढवावा अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एच. भरतगौडा व सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारून नवी दिशा द्यावी; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक

Spread the love  पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *