Wednesday , December 10 2025
Breaking News

डॉ. विश्वेश्वरय्या यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अभियंत्यांनी काम करावे

Spread the love

 

युवा नेते उत्तम पाटील : निपाणीत अभियंता दिन साजरा
निपाणी (वार्ता) : देशाच्या जडणघडणीमध्ये डॉ. एम विश्वेश्वरय्या यांचे योगदान मोठे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी केलेले कार्य आदर्शवत आहे. कोणताही उद्योग आणि व्यवसायात मनापासून कार्य करत असतानाही अनेक अडचणी येत आहेत. त्यासाठी केंद्र व राज्याचे धोरण एकत्र आणणे साध्य होत नाही. तरीही अडचणीवर मात करून निपाणी सीमाभागात अभियंत्यांनी आपले उद्योग व्यवसाय सुरळीतपणे सुरू केले आहेत. अभियंते डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निपाणी भागातील अभियंत्यांनी काम करावे, असे आवाहन बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांनी केले.
येथील असोसिएशन ऑफ आर्किटेक अँड इंजीनियअर्सतर्फे आयोजित डॉ एम. विश्वेश्वरय्या जयंती व अभियंता दिन गुरुवारी (ता.15) झाला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ अभियंते राजेंद्र पणदे, राजेश पाटील, सचिन नाईक, प्रदीप पाटील, सुहास परमणे, श्याम कित्तूर, डॉ. अरुंधती वाटेगावे, असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब ऐनापुरे, उपाध्यक्ष आसिफ मुल्ला, सचिव अमित रामनकट्टी, अनुप पाटील, चंद्रकांत पाटील, सुहास परमने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उत्तम पाटील म्हणाले, निपाणी शहराला तालुक्याचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे शहराला सुसज्जीत करण्यामध्ये असोसिएशनचा सिंहाचा वाटा आहे. त्या पुढील काळात असोसिएशनमध्ये नवीन सभासदांना सामावून घेऊन प्रत्येक सभासदांनी गावचे ऋण फेडले पाहिजे. असोसिएशन भावनाच्या कामांमध्ये अरिहंत उद्योग समूहातर्फे योगदान देणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन झाले. माजी सभापती व अभियंते अजय माने यांनी स्वागत केले. अभियंते गजानन वसेदार प्रास्ताविकात असोसिएशनच्या वाटचालीचा आढावा घेतला. अध्यक्ष काकासाहेब ऐनापुरे यांनी, असोसिएशनसाठी जागा मिळाल्या असून तेथे भावनाचे बांधकाम सुरू झाले आहे. पुढील कार्यक्रम सदरच्या भावनात करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
डॉ. अरुंधती वाटेगावे यांनी, काळानुसार इंजिनिअरिंग क्षेत्रातील होणार्‍या बदलाविषयी मार्गदर्शन केले. अर्बन डिझायनिंग विषयी मार्गदर्शन केले. आर्किटेक्चरमध्ये कल्पकता खूप महत्त्वाची आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
युवा नेते उत्तम पाटील यांना युथ आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा, राजेश पाटील यांनी असोसिएशनला 11 लाखाची देणगी दिली, पाटबंधारे खात्यातून निवृत्त झालेले अभियंते सी. डी. पाटील यांचाही असोसिएशनतर्फे मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.
कार्यक्रमास उमेश खोत, धनंजय खराडे, विजयकुमार मेठे, तौशीफ बागवान, सुदेश बागडी, प्रवीण पाटील, प्रमोद जाधव, अनुप पाटील, योगेश घाडगे, प्रशांत शहा, आदर्श कोळकी, अमित तांदळे, ओंकार वरुटे, श्रेयस मेहता, पी.जी. शेंदुरे, अभिजीत जिरगे, काकासाहेब खोत, नवीन बाडकर यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अमित रमणकट्टी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

Spread the love  चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *