
निपाणी : निपाणी नगरपालिकेच्या हद्दीत असणार्या व निवडणुकीपूरता वापर होणार्या जाधव मळ्यातील लोकांची परिस्थिती आदिवासी लोकांच्या सारखी झालेली आहे, लकडी पुलाजवळील पूल सखल भागात असल्यामुळे वाहतुकीस हा पूल धोकादायक बनलेला आहे, ऊस वाहतुक, तंबाखू वाहतूक, बुरुम वडविणारे डपंर वाहतूक तसेच किरकोळ वाहने चालवणे देखील अवघड झालेले आहे, त्याचबरोबर लकडी पूल ते गवाणी पर्यंतचा रस्ता देखील पूर्णपणे खराब व खड्डेमय झालेला असून जीव मुठीत घेऊन वाहतूक करणे भाग पडत आहे, रस्त्याच्या दोन्हीबाजूला झुडुपांनी निम्मा रस्ता काबीज केला असून त्यामुळं अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे, त्यात विद्युत पोलवरील लाईट कायमस्वरूपी बंद अवस्थेतच आहेत, नगरपालिकेत इकडील घरेही नोंद नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा पत्ताच नाहीय, जगण्यासाठी महत्वाचा घटक असणारा पाणी प्रश्न अमलझरीतील रहिवाशी अभिजित कौंदाडे व परिवार यांचेकडून येथील लोकांना त्यांच्या विहिरीतून, बोअरमधून पिण्यासाठी व घरगुती खर्चासाठी पाणी दिल्यामुळे येथील नागरिक समाधान जीवन जगत आहेत, तसेच आजूबाजूच्या लोकांनी देखील विहीर बोअरच्या माध्यमातून पाण्याची सोय करून घेतले आहेत. साखळी रस्ते नकाशात आहेत पण कामाच्या स्वरूपात प्रत्यक्षात काहीच हालचाल नाही, रात्री तर इकडील लोकांना अंधारात येताना जीव मुठीत घेऊनच यावं लागते. या जाधव मळा वाणी मठ रस्त्यावरून गव्हाणी अमलझरी, निपाणी तंवदी, पट्टणकुडीकडील नागरिकांची कामानिमित्त निपाणीकडे वर्दळ जास्त असते. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती पहायला मिळत आहे, त्यामुळे स्थानिक नगरसेवक, नगरपालिका, आमदार, खासदार यांनी या भागाची पाहणी करून वरील सर्व अडचणी सोडवाव्यात असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
केवळ नगरपालिका निवडणुकीपुरते या वार्डात 4,5 दिवस नेते आश्वासनाची भाषणे करून जातात. ते पुढच्या 5 वर्षानी परत तिचं आश्वासन घेऊन प्रचारासाठी येतात, असे मत येथील नागरिक प्रकाश जाधव, नागेश जाधव, संतोष जाधव, कल्लाप्पा चव्हाण, रामा चव्हाण, अक्षय बर्गे, दीपक चव्हाण, आकाश जाधव, चंदन चव्हाण, बंडा साळवी, वैभव जत्राटे, सदाशिव पोवार, सुमित पोवार, साकीब जमादार, बळी चव्हाण, धनाजी चव्हाण, साईनाथ भोसले, अंतू जाधव, बाळू जाधव, चांदखान परिवार, साळवे बंधू, चव्हाण बंधू, जाधव बंधू व येथील नागरिक, महिला वर्ग, युवकांनी असे मत मांडले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta