Thursday , March 5 2026
Breaking News

बोरगाव ’अरिहंत’ने ठेवीच्या एक हजार कोटीचा टप्पा ओलांडला

Spread the love

 

संस्थापक अध्यक्ष सहकार रत्न रावसाहेब पाटील : बोरगाव अरिहंत संस्थेची 32 वी वार्षिक सभा
निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी 1990 साली ज्या उद्देशाने आपण संस्था स्थापना केली. हा उद्देश सफल झाला आहे. सहकार क्षेत्रात काम करताना राजकारण विरहित संस्था चालविल्याने अरिहंत संस्था राज्यात नावलौकिक मिळवली आहे. सभासद व संचालक मंडळाच्या मागणीनुसार पुढील काळातही अरिहंत संस्था कर्नाटका बरोबरच महाराष्ट्र व गोवा राज्यातही विस्तारित होणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सहकार रत्न रावसाहेब पाटील (दादा) यांनी दिली. त्यांनी मांडलेल्या या ठरावास सभासदांनी टाळ्या वाजवून मंजुरी दिली.
येथील अरिहंत सभागृहात आयोजित संस्थेची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
रावसाहेब पाटील म्हणाले, जिल्ह्यासह राज्यात सहकार क्षेत्राचे आर्थिक सहकार्याची जाळी विणलेले श्री अरिहंत संस्थेची सर्वसामान्य सभासद व शेतकर्‍यांच्या विकासासाठी अरिहंतने विविध ठिकाणी शाखा विस्तारित करून त्यांच्या आर्थिक संकटात नेहमीच मदत केली आहे. अहवाल सालात संस्थेत एकूण 12703 सभासद, 4 कोटी 54 लाख 51 हजार शेअर भांडवल, 56 कोटी 58 लाख 88 हजारांची निधी असून अहवाल सालात 1024 कोटी इतकी ठेव आहे. संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी 19 कोटी 18 लाखांवर गुंतवणूक केली आहे. वाहन खरेदी, पाणी योजना, घरबांधणी याबरोबरच विविध उद्योगधंदे उभारण्यासाठी संस्थेचे वतीने 794 कोटी 85 लाखांवर कर्ज वितरण केले असून संस्थेस अहवाल सालात 8 कोटी 52 लाखांचा निव्वळ नफा झाले आहे. अहवाल वर्षी 107 विद्यार्थ्यांना सुमारे 3 लाख 45 हजार 90 पर्यंत स्कॉलरशिपचे वितरण करण्यात आले आहे. 48 शाखाद्वारे कार्य करणार्‍या अरिहंत संस्थेत 17 शाखा स्वमालिकेची इमारतीमध्ये आहेत. तर 10 शाखेत स्टॅम्पिंग सेवा पुरविण्यात येत आहे.
प्रधान व्यवस्थापक अशोक बंकापूरे यांनी नफा-तोटा अंदाजपत्रकाचे वाचन करून मंजुरी मिळवली. याप्रसंगी रावसाहेब पाटील यांनी उत्कृष्ट शाखा म्हणून अक्कोळ तर उत्तम व्यवस्थापक म्हणून निपाणी शाखेचे राजेंद्र बन्ने, उत्तम सेवक म्हणून सुनील मेलगिरे, शांतिनाथ बेडकीहाळे यांची घोषणा केली. याचा संस्थेमार्फत प्रमाणपत्र व शिल्ड व रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
युवा नेते उत्तम पाटील यांनी, सध्या सहकारी संस्थांमध्ये अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे काही अंशी संस्था चालविणे कठीण वाटत असताना अशा परिस्थितीतही आपल्या अरिहंत सौहार्द संस्थेने योग्य नियोजन, कर्तव्यदक्ष जबाबदारी पार केल्याने आज संस्था आर्थिक प्रगती साधत आहे. संस्थेच्या सहकार्याने बेळगाव येथील सुसज्ज अरिहंत हॉस्पिटल, साखर कारखान्यांना सहकार्य, सभासदांन बरोबर सभासदांच्या मुलांनाही संस्थेचा लाभ मिळावा यासाठी नवनवीन शैक्षणिक योजना हाती घेतल्या असल्याचे सांगतीले.
युवा नेते उत्तम पाटील यांना पुणे येथील युथ आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा, दहावी व बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी सहकार क्षेत्रात अरिहंत संस्था व उद्योग समूहाने भरारी घेतली आहे. यापुढे काळात आपण अरिहंत परिवाराच्या सोबत असल्याचे सांगितले. निपाणी रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पठाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
सभेस युवा उद्योजक अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, सुजय पाटील, उपाध्यक्ष सुभाष शेट्टी, संचालक जयगोंडा पाटील, अक्षयकुमार करोले, जयपाल नागावे, आप्पासाहेब कडोले, पिरगोंडा पाटील, भुजगोंडा पाटील, शरदकुमार लडगे, सतीश पाटील, बाबासाहेब आपराज, श्रीकांत वसवाडे, निर्मला बल्लोळे, अजित कांबळे, मुख्य व्यवस्थापक ए. जे. बंकापुरे, एस. के. तेरदाळे, राजू पाटील- अकोळ, अरुण निकाडे, महेश पाटील, सुंदर पाटील, अशोक पाटील, बंडा पाटील, निवास पाटील, के. डी. पाटील,शिरीष कमते, इम्रान मकानदार, प्रकाश गायकवाड, निरंजन पाटील, शिवाजी रानमाळे, रोहन भिवशे, इंद्रजीत पाटील, शरदचंद्र पाठक, मलकारी तेरदाळे, शंकर माळी, चेतन स्वामी, आर. टी. चौगुले, प्रकाश जंगटे यांच्यासह सर्व शाखांचे पदाधिकारी व सभासद कर्मचारी उपस्थित होते. आर. एस. पचंडी यांनी सूत्रसंचालन केले. तर नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारून नवी दिशा द्यावी; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक

Spread the love  पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *