अरिहंत दूध संस्थेतर्फे मोफत लसीकरण
निपाणी (वार्ता) : गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये जनावरांना लंपी आजार जडला आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक सीमाभागात त्याचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी आपण दूध संस्थेतर्फे बोरगाव आणि परिसरातील सर्वच जनावरांना मोफत लसीकरण सुरू केले आहे. शेतकर्यांच्या पाठीशी अरिहंत परिवारसंस्था असून शेतकर्यांनी घाबरू नये. या लसीकरणाचा लाभ सर्वांनीच घ्यावा असे आवाहन युवानेते उत्तम पाटील यांनी केले.
सीमाभागातही लंपी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षता घेऊन बोरगाव येथे जनावरांना मोफत लसीकरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
बोरगाव अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघ व कोल्हापूर येथीलगोकुळ दूध संघाच्या संयुक्त विद्यमाने लंपी स्किन रोगाचा संसर्ग लक्षात घेऊन लसींचे मोफत वितरण झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मायगोंडा पाटील, उपाध्यक्ष शिवाजी तोडकर, संचालक शीतल कल्लू हवले, रमेश माळी, रावसाहेब अनगोंडा पाटील, हिराचंद चव्हाण, जयपाल कोरवी, अजित सावळवाडे, अनिल बुलबुले, रोहित पाटील, सुमित रोड्ड, प्रमिल पाटील, बारवाडचे अभिनंदन कोल्हापुरे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta