अध्यक्ष अभयकुमार मगदूम : 13 वी वार्षिक सभा
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री जय गणेश मल्टिपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटीस अहवाल सालात 10 लाख 2 हजार 680 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी दिली. संस्थेच्या 13 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बी. टी. वठारे हे होते.
अभय मगदूम म्हणाले, सध्याच्या काळात सहकारी संघ चालवणे कठीण बनले आहे. स्पर्धात्मक युगात संस्था टिकवणे सर्वच संस्थाचालकांना अवघड बनले आहे. यातच कोरोना व महापूर यामुळे गेल्या दोन वर्षापासून सर्वच क्षेत्रातील आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. अशा परिस्थितीत ही संस्थेने आर्थिक प्रगती साधली आहे. संस्थेने पारदर्शी व चोख कारभार करीत सभासदांसाठी विविध योजना हाती घेतली आहे. कर्जदार हा संस्थेचा आर्थिक कणा असल्याने कर्जदारांना वेळेत कर्ज मंजूर करून त्यांची आर्थिक पत सुधारण्याचे काम संस्था स्थापनेपासून करीत आहोत. संचालक व कर्मचार्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे संस्थेने सात कोटींवर ठेव जमा केली आहे. संस्थेत एकूण 799 सभासद, 10 लाख 57 हजार शेअर भांडवल आहे. संस्थेने 2 कोटी 48 लाख 82 हजार गुंतवणूक केली आहे. सभासद, शेतकरी, वाहनधारक, अल्पभूधारक, व्यापारी यांना 4 कोटी 75 लाख 29 हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. 7 कोटी 78 लाख वार्षिक उलाढाल झाली असून संस्थेने अहवाल सालात 10 लाख 2 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. भविष्यात सभासद साठी विविध योजना आपण हाती घेतले आहोत.
प्रारंभी मान्यवरांच्या दीप प्रज्वलन करून युवा नेते उत्तम पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांचा संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला. दरम्यान संस्थेच्या अंधार ताळेबंद पत्रकाचे वाचन संस्थेची प्रधान व्यवस्थापक संतोष हंचनाळे यांनी केले.
सभेस उपाध्यक्ष सचिन रोड्ड, संचालक राजगौडा पाटील, तेजपाल मगदूम, रामगोंडा पाटील, इलाई मकानदार, रावसाहेब सवाडे, कुणाल वठारे, राजेंद्र फिरगन्नावर, बाहुबली फिरगन्नावर, मौला मुजावर, रोहिणी फिरगन्नावर, सन्मती हंजे, व्यवस्थापक संतोष हंचनाळे, अनिल मगदूम, अभयकुमार पाटील, राजू मगदूम, माणिक कुंभार, तुळशी वसवाडे, प्रदीप माळी, अश्विनी मगदूम, शोभा हवले, सुजाता पाटील यांच्यासह पदाधिकारी व संचालक उपस्थित होते. बाहुबली मगदूम यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta