निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील देवचंद महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी आज सर्वत्र मोठ्या पदावर काम करत असून त्यांच्या कामा बरोबरच अनेक समाज उपयोगी कामाची जोड देऊन समाजाप्रती आपली काही देणे लागत असल्याचा उदात्त भावनेतून सर्वत्र कार्य करताना आपण पाहत असतो. महाविद्यालयामध्ये सध्या शिकत असणारे आजी विद्यार्थी देखील काही कमी नाहीत आपल्या बरोबरच सर्व
प्राणिमात्रांना देखील जगण्याचा तेवढाच अधिकार असल्याच्या
भावनेने एखाद्या पक्षाला देखील जीवदान देण्यास हिरीरीने
सहभाग नोंदवतात. प्राणीशास्त्र विभाग, देवचंद कॉलेज अर्जुन नगर, येथील ‘ऍनिमल रेस्क्यु टिम’ अंतर्गत काम करणारे बीएससी भाग दोन मधील विद्यार्थी विद्यार्थीनी प्रतिक्षा भोई, प्राजक्ता राऊत, प्रज्ञा पाटील, ऋतुजा थिटे हर्षवर्धन माने, कार्तिक पाटील, या विद्यार्थ्यांनी बुलबुल या पक्ष्याला जीवनदान दिले. हा पक्षी त्यांना जखमी अवस्थेत पाण्यात पडलेला आढळला. विद्यार्थ्यांनी त्याला प्रथमताः पाण्याबाहेर काढून त्याला सुरक्षित ठिकाणी आणून त्याची अन्न पाण्याची सोय केली. लागलीच त्या पक्षाला प्राथमिक उपचारासाठी पक्षीमित्र फिरोज चाऊस यांच्या कडे स्वाधीन करण्यात आले. अनेक वेळा देवचंद कॉलेजचे प्राणीशास्त्र विभागाचे हे विद्यार्थी नियमित पशु जिवदानाचे कार्य सातत्याने करत असतात. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे.
Belgaum Varta Belgaum Varta