सौंदलगा : सौंदलगा येथे मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या निधीतून मंजूर होऊन बांधत असलेल्या श्री बिरदेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी डॉ. विरेंद्र हेगडे यांच्या आशीर्वादाने चालवण्यात येत असलेल्या धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी संघामार्फत दीड लाखाचा धनादेश दिला. सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कोगनोळे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. महिलांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष चिकोडी जिल्हा निर्देशक कृष्णा टी (सर) हे होते. कृष्णा टी (सर) आपल्या भाषणात म्हणाले की, धर्मस्थळ व ग्रामीण अभिवृद्धी संघाकडून करण्यात येत असलेल्या समाज उपयोगी कामांचा थोडक्यात आढावा घेतला. यानंतर पीएलडी बँकेचे अध्यक्ष एस. एस. ढवणे (सर) आपल्या भाषणात म्हणाले की, धर्मस्थळ व ग्रामीण अभिरुद्धी संघाकडून सौंदलगा व परिसरामध्ये अनाथ महिला, अपंग, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मंदिरासाठी निधी इत्यादी सामाजिक कार्य राबवत एक चांगले समाजकार्य करत आहेत. यावेळी निपाणी तालुका योजना अधिकारी जाफर आत्तार सुपरवायझर प्रकाश नेसरकर, सेवा प्रतिनिधी व वकुट पदाधिकारी तसेच माजी तालुका पंचायत सदस्य आप्पासाहेब ढवणे, ग्रामपंचायत अध्यक्ष अर्चना कोगनोळे, सदस्य सुजाता भानसे, सदस्य भीमराव भानसे, मल्लेश बोरगुंडे, शिवाजी भानसे, भीमा भानसे, कुमार निप्पाणे, वासू भानसे, कृष्णा भानसे, बिरू डोणे, सिद्धू भानसे, निंगाप्पा भानसे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सुरेश भानसे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta