निपाणी (वार्ता) : कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या 2022 ते 2027 या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची निवड हुपरी (ता. हातकणंगले) येथील हुतात्मा स्मारक इमारतीमध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बिनविरोध करण्यात आली. अध्यक्षपदी यशवंतराव संताजी पाटील (हुपरी) तर सचिवपदी बाळासाहेब सुर्यवंशी (निपाणी) यांची फेरनिवड झाली.
कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या 2022 ते 2027 या कालावधीसाठीचे, कार्यकारी मंडळ असे, अध्यक्ष यशवंतराव पाटील (हुपरी), उपाध्यक्ष बी. डी. सावगावे (कुरुंदवाड), उपाध्यक्ष – महादेव कानकेकर (मुरगुड), सचिव बाळासाहेब सूर्यवंशी (अर्जुननगर कागल) सहसचिव – सुनील चव्हाण (कुरुंदवाड), खजिनदार – नानासाहेब गाट (हुपरी).
सदस्य शिवाजीराव चोरगे (गारगोटी), अरविंद भोसले (पन्हाळा), नितीन दिंडे (कागल), पराग जोशी (पन्हाळा), महेश काशीद (पन्हाळा) रोहित नांद्रेकर (जयसिंगपूर), महादेव खराडे (मुरगूड), सुनील कल्याणी (हुपरी), बाळसिंग मिसाळ (कोल्हापूर) व सुभाष कागले (हुपरी).
निवडीवेळी विलास कालेकर, भालचंद्र आजरेकर, आनंदराव कल्याणकर, संग्रामतोडकर, पप्पू आडनाईक, प्रवीण मोरबाळे, संभाजी मांगले, संजयपाटील, वैभव आडके, योगेश वराळे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta