Sunday , July 26 2026
Breaking News

बहुजन समाजाच्या उद्धारासाठीच रयतची स्थापना : संगीता साळुंखे

Spread the love

 

कुर्ली हायस्कूलमध्ये कर्मवीर जयंती
निपाणी (वार्ता) : अस्पृश्यतेविरुद्ध बंड, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, अंधश्रद्धा, कामगारावरील अन्याय आणि आर्थिक विषमता याबाबत सजग राहून बहुजन समाजाच्या उद्धारासाठीच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली, असे मत माई फौंडेशन किवळ-कर्‍हाडच्या अध्यक्षा संगीता साळुंखे यांनी केले. त्या कुर्ली येथिल सिद्धेश्वर विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी तानाजी पाटील मैराळ हे होते.
बी. एस. पाटील यांनी स्वागत केले. निपाणी येथील डॉ. कौस्तुभ खांडके व डॉ. प्रियांका खांडके यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. गावातून सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सुवासिनीनी व ग्रामस्थांनी मिरवणुकीचे जागोजागी स्वागत केले. संगीता साळुंखे व के. आर. वाळवे यांचा देणगी दिल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. एस. एस. चौगुले यांनी पारितोषिक अहवाल वाचन केले. मान्यवरांच्या हस्ते आजी-माजी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
साळुंखे म्हणाल्या, कर्मवीरांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. तेजस्विनी राऊत, मंजिरी कांबळे, श्रुती सित्रे, सुजित यादव, केदार मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संजय शिंत्रे, अरुण निकाडे, सिमताई पाटील, रामचंद्र निकाडे, आनंदा ढगे, सिदगोंडा शेडबाळे, एम. एच. बरगाले, सुभाष निकाडे, सुर्याजी पोटले, कुमार माळी, पी. टी. कांबळे, के. टी. चौगुले, यांच्यासह आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. एस. एस. साळवी यानी सूत्रसंचालन केले तर ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *