सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन संघाची वार्षिक सर्वसाधारण सभाखेळीमेळीत पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन संजय शिंत्रे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघाचे सचिव बाळासाहेब रणदिवे यांनी सर्वांचे स्वागत करून संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यानंतर संघाचे चेअरमन संजय शिंत्रे यांनी सांगितले की, संघाचे एकूण सभासद 1665 असून संघाचे शेअर भांडवल चाळीस लाखाच्या वर असून संघामार्फत सभासदांना कर्ज वितरण केले जाते. याबरोबरच संघाकडून रेशन विभाग, खत विभाग, दूध विभाग हे सुरू आहेत. संघाचा सन 2021-22 चा ऑडिट वर्ग अ असून संघाकडून नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यावर्षी सभासदांना 13 टक्के लाभांश वाटप करण्यात येणार आहे. या वर्षी संघास 17 लाख 53 हजार निव्वळ नफा झाला आहे.
यावेळी संघाचे संचालक आप्पासाहेब ढवणे, डॉ. तानाजी पाटील, महादेव कांबळे, सबगोंडा पाटील, भारतसिंग रजपूत राजश्री मोरे, बि.आर. चौगुले, विमल पाटील, अंजना नाईक, संभाजी साळुंखे, ग्रा.प. सदस्य रेखा पोवार, चंद्रकांत पाटील, प्रकाश कांबळे, अण्णासाहेब पाटील, विनोद कांबळे, शरद चौगुले, गणपतराव कोठवाळे, आर. बी. मगदूम, बंडा हातकर, शिवाजी भानसे, अशोक पाटील, मारुती साळुंखे, दिनकर शेवाळे, विनायक कुलकर्णी, आरीफ मुल्ला, एकनाथ हातकर, रघुनाथ शिंदे, दिनकर पाटील, सर्जेराव साळुंखे, यासह संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार संचालक डॉ. संजय आडसूळ यांनी मांनले.
Belgaum Varta Belgaum Varta