Sunday , July 26 2026
Breaking News

सौंदत्तीजवळ भीषण अपघात; 4 जण ठार

Spread the love

बेळगाव : ट्रक, कार आणि दुचाकी यांची परस्परांमध्ये धडक होऊन झालेल्या तिहेरी अपघातात चौघे जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. सौंदत्ती तालुक्याच्या बुडीगोप्प क्रॉस नजीक ही घटना घडली.

लोकापूरहून गोव्याकडे निघालेल्या सिमेंट लॉरीची बेळगावहून जाणाऱ्या कार आणि दुचाकीला धडक झाली. कार चालक निखिल कदम (वय 24, रा. बेळगाव), कुडची स्टेशनच्या एएसआय हलाकी यांची पत्नी रेणुका (48) यांचा जागीच मृत्यू झाला. एएसआय हलाकी यांची मुलगी अक्षता (22) आणि अपघातग्रस्त दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या हनमाव्वा (66) यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

एसपी संजीव पाटील, अतिरिक्त एसपी महानंद नंदागावी यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *